Ad will apear here
Next
सावरकर सेवा संस्थेतर्फे ठाण्यात २८ ऑक्टोबरला ‘दिवाळी पहाट’


ठाणे :
ठाण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा संस्थेतर्फे दर वर्षीप्रमाणे यंदाही ‘दिवाळी पहाट’ या दिमाखदार सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी, २८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजता ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार आहे. 

दिवाळीचा फराळ, रांगोळ्या, आकाशकंदील, फटाके यांच्या जोडीला ‘ह्या हृदयाचे हृदयास त्या... ’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ आणि ‘फुलपाखरू’फेम गीतकार-संगीतकार विशाल राणे यांनी कार्यक्रमाची रचना केली आहे. सुप्रसिद्ध गायक मंगेश बोरगावकर यांच्यासह गायिका दीपाली देसाई, रक्षा जाधव, अभिनेता-गायक आशिष जोशी यांच्या सुरांची मैफल या वेळी रंगणार आहे.

कार्यक्रमाला प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक मंदार देवस्थळी उपस्थित राहणार असून, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटणकर आणि रिद्धी भावे करणार आहेत. त्याचबरोबर विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांना विशेष निमंत्रित करण्यात आले असून, या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य आहे. 

स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा संस्था ही सामाजिक बांधिलकी जपणारी, राष्ट्रहित जोपासणारी संस्था असून, गेली २२ वर्षे या संस्थेद्वारे वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये प्रामुख्याने स्वा. सावरकर जयंती उत्सव, स्वा. सावरकर पुण्यस्मरण दिन, वार्षिक केंद्रीय अर्थसंकल्प व्याख्यान, स्वा. सावरकर विश्व साहित्य संमेलन आणि दिवाळी पहाट आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांद्वारे समाजातील सर्व स्तरांतील लोकांशी जोडण्याचा संस्थेचा प्रयत्न असतो. याच भावनेतून दर वर्षी एखाद्या सामाजिक संस्थेला आर्थिक मदत केली जाते. संस्थेच्या विविध उपक्रमांनिमित्त आजवर अनेक मान्यवर व्यक्ती, कलावंत, व्याख्याते, समाजसेवक संस्थेच्या कार्यात सहभागी झाले आहेत. 

अधिक माहितीसाठी संपर्क : दीपक दळवी – ९८२०४ ४०८२१
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZSRCF
Similar Posts
आदिवासी निर्मित पर्यावरणपूरक दिवे, कंदील यांचे प्रदर्शन पुणे : देशभरातील आदिवासी आणि ग्रामीण कलाकारांनी तयार केलेले पर्यावरणपूरक दिवे, आकाशकंदील, लामणदिवे, तसेच दिवाळीसाठी भेटवस्तू आणि गृह सजावटीच्या अनेक कलाकृतींचे प्रदर्शन ट्राईब छत्री कलादालनात भरविण्यात आले आहे.
धनत्रयोदशीला दागिने खरेदीसाठी लोकांची गर्दी पुणे : दिवाळीचा उत्साह आता बाजारपेठेत जाणवू लागला आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर दागिने खरेदीसाठी लोकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.
वसुबारस, धनत्रयोदशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट सोलापूर : वसुबारस आणि धनत्रयोदशीनिमित्ताने शुक्रवारी (२५ ऑक्टोबर) पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मंदिरांचा गाभारा आकर्षक, रंगीबेरंगी फुलांनी सजविण्यात आला होता.
चिमुकल्यांनी केली पर्यावरणपूरक दिवाळीची तयारी पुणे : बावधनमधील गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी यंदा पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी स्वतःच आकर्षक कंदील, तोरणे आणि रंगीत पणत्या तयार केल्या. त्यांना या कामात पालकांनीही उत्साहाने मदत केली. रंगीबेरंगी कागद, खडू, माती यांच्या साह्याने मुलांनी सुंदर आकाशकंदील आणि नक्षीदार पणत्या बनवल्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language